नागपूर महानगरपालिका लसीकरण केंद्रात कोव्हिशिल्ड मात्रा उपलब्ध

उपराजधानी नागपूर

नागपूर : राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रात शनिवारी १४ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
दरम्यान, नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम आणि दुसरा मात्रा घेण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

लसीकरणसाठी आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. शिवाय ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षे आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.
तसेच, १८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोगनिदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हॉल दिघोरी आणि आयुष रुग्णालय सदर येथे उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *