‘सेवाश्रय-अभिवृत्त नवरत्न नारी’ पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

उपराजधानी नागपूर

नागपूर : सेवाश्रय बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था आणि अभिवृत्त न्यूज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कार्य कर्तृत्ववान महिलांना ‘सेवाश्रय-अभिवृत्त नवरत्न नारी’ [ SEWASHRAY-ABHIVRUTTA NAVRATNA NARI AWARD ] पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संबंधितांकडून यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत.

आजच्या घडीला समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गाव शहरातील अंगणवाडीपासून संरक्षण क्षेत्रातील मोठी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. इतकेच काय अंतराळात सुद्धा महिला पोहोचली आहे. आपले संघटन आणि नेतृत्व गुणांतून यशाच्या पायºया चढत आहे़ उद्योग, व्यवसायातही आपले पाय भक्कमपणे रोवल्याचे दिसून येते.

या विविध कार्याची दखल घेण्यासाठी सेवाश्रय बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील अभिवृत्त न्यूज पोर्टलच्या वतीने शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, राजकारण, अर्थकारण, बचतगट, व्यवसाय, संगीत, वाड्.मय या नऊ क्षेत्रातील महिलांना ‘सेवाश्रय-अभिवृत्त नवरत्न नारी’ पुरस्कार देण्यात येणार आहे. विशेष समितीकडून यशस्वितांची निवड करण्यात येईल.

उपरोक्त क्षेत्रातील महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख शब्दबद्ध करून तो प्रस्तावाच्या रूपात sewashraygrameen@gmail.com या ई-मेल आयडीवर 15 सप्टेंबर 2021 पर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *