Home आंतरराष्ट्रीय बातम्या हैती देशात 7.2 तीव्रतेचा भीषण भूकंप

हैती देशात 7.2 तीव्रतेचा भीषण भूकंप

32

पोर्ट आॅ प्रिंस : हैती देशात रिश्टर स्केलवर 7.2 तीव्रतेचा भूकंप [ MAGNITUDE SHAKE ] आला असून, अनेक घरे जमीनदोस्त झाली आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार 29 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

हैतीच्या समुद्र किनाºयालगतच्या भूभागाला भूकंपाचा जोरदार हादरा बसला. त्याचे केंद्रबिंदू उत्तर पूर्वमध्ये 12 किलोमीटर दूर संत लुईस दु सुडमध्ये असल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

दरम्यान, पोर्ट आॅ प्रिंसमध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर लोक घराच्या बाहेर पडली. मोठे हादरे जाणवल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. लाखो लोक रस्त्यावर येऊन थांबले होते, तर काहीजण घराच्या ढिगाराखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.