Home प्रादेशिक विदर्भ रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1634 जणांनी घेतला मेळाव्याचा लाभ.

रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1634 जणांनी घेतला मेळाव्याचा लाभ.

66

अकोला : जिल्हा पोलिस बाल न्याय मंडळ आणि तिक्षागत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून येथील पोलिस लॉनमध्ये आयोजित स्वयम् रोजगार व स्वयम रोजगार मेळाव्याला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 1634 युवक-युवती, महिलांनी लाभ घेतला.

मेळाव्याला उपस्थिती दर्शविलेल्या किमान तीनशे उमेदवारांना विविध कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या हस्ते उद्योजक, सिटी चाईल्ड लाईन आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दोन महिला उद्योजकांनी मनोगत व्यक्त केले. विविध 20 स्टोलला दिवसभरात अनेक मान्यवरांनी भेटी देऊन सुंदर आयोजन आणि नियोजनबाबत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी मेळाव्याच्या समन्वयिका जया भारती इंगोले यांनी प्रा. संजय खडसे यांची प्रकट मुलाखत घेतली. व्यासपीठावर प्राध्यापक संजय खडसे, बाल न्याय मंडळाचे सदस्य Adv संजय सिंगर Adv अनिता शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांची विशेष उपस्थिती होती.

दुपारच्या सत्रात विधवा घटस्पोटीत आणि परितक्त्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रस्तावना अनिता शिंदे गुरव यांनी केली. अपर पोलीस अधीक्षक अकोला मोनिका राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. क्षितिज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष स्नेहल कदम यांनी महिलांना बहुमोल मार्गदर्शन केले. जया भारती इंगोले यांनी मोनिका राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. निलेश गाडगे यांनी शकुंतलाबाई या पत्रांमधून महिला सक्षमीकरणाचा सुंदर संदेश दिला. कोरोनाकाळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस अंमलदार आणि अधिकारी व सर्व स्टॉलधारकांचा विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने नितीन खंडेलवाल यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गाडगे आणि जया भारती इंगोले यांनी केले. आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले. अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशानुसार रोजगार स्वयंरोजगार मेळावाचा यापुढेही अधिकाऱ्यांवर जबाबदारी देत पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे मत व्यक्त केले.