Home प्रादेशिक विदर्भ स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष  ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करणार, बच्चू कडू यांची...

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष  ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करणार, बच्चू कडू यांची घोषणा

26

अकोला : भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष [ INDEPENDANCE DAY 2021] हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्ताने सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल,अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ ना. बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

आपण सारेजण तिरंग्याचे पाईक आहोत. राष्ट्र प्रथम या विचारातून आपण कार्यरत राहू. स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात   ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करु. अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावतांनाच सामान्य माणसांच्या हिताचे विषय अजेंड्यावर घेऊन मार्गी लावण्यासाठी आपण व आपले प्रशासन कार्य करेल. बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकुल’ हा प्रकल्प कार्यान्वित करु. अनाथांनाही हक्काचे घर देणार. सामान्य नागरीकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबविणार. देशाचा नागरिक हा बलशाली असावा तसेच तो नागरिक  तक्रारमुक्त, चिंतामुक्त  व आरोग्य युक्त असावा यासाठी प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहिल,असे पालकमंत्र्यांनी [ Minister Bachhu Kadu ]  सांगितले.

तिसऱ्या लाटेसाठी सज्जता : कोरोनाच्या काळात लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या  आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, सेवाभावी संस्था यांनी चांगले काम केले. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठी जोखीम होती, मात्र गेल्या वर्षभरात प्रयत्नपूर्वक ऑक्सिजन पुरवठ्याबाबत परिपूर्णता करुन कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज आहे. खरेतर ही तिसरी लाट येऊच नये अशी प्रार्थनाही आपण करु,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1634 जणांनी घेतला मेळाव्याचा लाभ