गडचिरोली जिल्हा विकासाच्या वाटेवर : राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

पूर्व विदर्भ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यात येत आहेत. दळणवळणाची कामे मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर असून गडचिरोली जिल्हा मुख्य प्रवाहात येत असून भविष्यात राज्यात इतर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा हा विकासात अग्रेसर असेल, असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, ना.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सोहळयास जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी,  जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी,कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली. राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढणे सर्वांचे कर्तव्य आहे असे म्हणाले. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचे स्थान आहे. जिल्ह्यातील भाषा, भौगोलिक परिसर, निसर्ग जणू एक मिनी भारतच असल्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *