मुलींनाही देता येणार NDA ची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

राष्ट्रीय

नवी दिल्ली : देशातील मुलीही एनडीएची [ NATIONAL DEFENCE ACADEMY ] परीक्षा देऊ शकतात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज   दिला आहे. यापूर्वी महिलांना एनडीएची  परीक्षा देत येत नव्हती. या निर्णयामुळे मुलींसाठी परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; पण मुलींना एनडीए परीक्षेतून लष्करात भरती करून घेतलं जाणार की नाही? याबाबत कोणताही निर्णय देण्यात आला नाही.

5 सप्टेंबर रोजी एनडीएची आगामी परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची भरती केली जाते. ही परीक्षा फक्त पुरुषांना देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण अ‍ॅकेडमी (NDA) आणि नौदल अॅकेडमी परीक्षा (NAE) या दोन परीक्षा महिलांनाही देता याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड दाखविणे आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *