घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ

राष्ट्रीय
  • सामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका 

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट:  पेट्रोलियम कंपन्यांनी विना-सबसिडी असणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ सोमवारी रात्रीपासून लागू केली आहे. [ INCREASE IN DOMESTIC CYLINDER PRICE ]

वाढीनंतर मुंबईत दर एलपीजी गॅस सिलेंडरचे 859.5 रुपये आहेत, दिल्लीतही 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एवढेच आहेत. कोलकाता आणि लखनौमध्ये दर अनुक्रमे 886 रुपये आणि 897.5 रुपये आहेत. दरम्यान 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीतही 68 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत  1 हजार 618 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यातच तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.

मुलींनाही देता येणार NDA ची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *