Home रानशिवार तालिबान्यांना रस्त्यांवर महिलांच्या पावलांचाही आवाज नको…

तालिबान्यांना रस्त्यांवर महिलांच्या पावलांचाही आवाज नको…

67
TALIBANI AGAINEST HUMANITY : बहुतांश अफगाणी ठिकाणांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानी दहशतवादी संघटनेने सत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अशातच देशातील महिलांवर विविध बंधने लादली असून, नियम आखून दिले आहे. त्याचे पालन न केल्यास शरीराचे अवयव तोडण्यापासून मृत्यूदंडापर्यंत शिक्षा देण्याची धमकी दिली जात आहे.
महिलांना कोणत्याही जवळच्या नातेवाईकांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. महिलांना घराबाहेर जाताना नेहमी बुरखा घालावाच लागेल. पुरुषांना महिलांच्या चालण्याचा/पावलांचा आवाज ऐकू येऊ नये. म्हणून महिलांना उंच टाचेचे बूट, चप्पल वा सँडल्स घालता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये. घरातील महिलांना कोणी पाहू नये, यासाठी तळमजल्यावर असणाºया घरांच्या खिडक्या रंगवलेल्या असाव्यात. महिलांना छायाचित्र काढता येणार नाहीत. वर्तमानपत्र किंवा पुस्तकात छापता येणार नाहीत किंवा घरातही लावता येणार नाहीत. कोणत्याही ठिकाणाच्या नावात महिलासंबंधी हा शब्द काढून टाकावा. महिलांना घराची बाल्कनी किंवा खिडकीत उभे राहता येणार नाही. महिलांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेता येणार नाही. महिलांना नेल पेंट लावता येणार नाहीत. स्वत:च्या इच्छेने लग्न करता येणार नाही. घट्ट कपडे वापरता येणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिला कोरोनाच्या लाटेसंबंधी इशारा, काहींच्या वर्तवणुकीबद्दल चिंता व्यक्त
तालिबानी संघटना क्रूर शिक्षा देण्यासाठी कुख्यात आहेत. त्यांचे नियम कोणत्याही महिलेने तोडल्यास तिला क्रूर शिक्षेला सामोरे जावे लागते.
अनैतिक संबंधांसाठी महिलांना सार्वजनिक ठिकाणी मारण्यात येते. एखाद्या मुलीने ठरवलेले लग्न करण्यास नकार देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास मुलीचे नाक आणि कान कापले जातात.

लहानग्या आदितीचे मंत्रिमंडळाने केले कौतुक, पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी …