Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य ला जवाब लारा….

ला जवाब लारा….

160

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट आज 19 आॅगस्ट रोजी पडद्यावर येत आहे. एका विमान अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून, अक्षयकुमार हेर अधिकारी म्हणून भूमिकेत आहे. मात्र, त्याच वेळी लारा दत्ताने एक विशेष भूमिका साकारली आहे़ यात ती देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे.


या नव्या गेट-अपमध्ये लाराला आपण बिल्कुल ओळखू शकत नाही. चित्रपटात तिने ‘प्रोस्थेटिक्स मेकअप’ चा वापर केला आहे. तिच्या व्यक्तीरेखाबरोबर मेकअप आर्टिस्टचे ही मोठे कौतुक होत आहे. कारण हा कलाकार मराठमोळा असून, त्याचे नाव विक्रम गायकवाड असे आहे. याशिवाय स्व. इंदिराजींच्या केशरचनेशी साम्य असलेला विग सुद्धा त्यांनीच तयार केला आहे.

लाराचे वडिल एल. के. दत्ता पंजाबी असून, आई जेनिफर अँग्लो इंडियन आहे. अशा कुटुंबातील लाराने सन 2000 मिस युनिव्हर्स हा पुरस्कार मिळवला होता. यानंतर तिने मस्ती, नो एन्ट्री, काल, भागम भाग, पार्टनर, हाऊसफुल, चलो दिल्ली अशा चित्रपटांतून भूमिका साकारल्या.

सन 1991 मध्य दत्ता परिवार उत्तर प्रदेशातून बंगळुरूमध्ये शिफ्ट झाला. येथील सेंट जेव्हियर्स गर्ल्स हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले असून, लाराने अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. ती पंजाबी, कन्नड, फ्रेंचसोबतच इंग्रजी भाषांतून संवाद साधू शकते. लाराने 2011 मध्ये टेनिस खेळाडू महेश भूपतीसोबत विवाह केला़ त्यांना सायरा नामक मुलगी आहे.