Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र डाॅ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी यांच्या स्मृतिदिनी राज्यभरात विविध कार्यक्रम

डाॅ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी यांच्या स्मृतिदिनी राज्यभरात विविध कार्यक्रम

20

नाशिक : डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या शुक्रवारी 20 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनेच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सीबीएस येथील हुतात्मा स्मारक स्मारक येथे सकाळी दहा ते बारा या वेळेत कोरोनाचे नियम पाळून हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे. डाॅ. संजय वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.त्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण होणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी कोरोनाचे नियम पाळून वेळेत हजर रहावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नाशिक जिल्हा प्रधान सचिव ॲड.समीर शिंदे व शहर कार्याध्यक्ष नितीन बागूल यांनी केले आहे.