रोजगार निर्मितीत वाढ झाल्यास नक्षलवाद संपेल : एकनाथ शिंदे

पूर्व विदर्भ
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रोजगार निर्मितीसाठी आवश्यक सोयीसुविधा व दळणवळणाची साधने जिल्ह्यात उभी राहत असल्याचे ते म्हणाले. [ EKNATH SHINDE IN GADCHIROLI ]
पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते जिल्ह्यातील 27 कोटी रू. कामांच्या शुभारंभासह 46 वाहने व ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन प्लांट, जलतरण तलावाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. जिल्हा पोलीस क्रीडांगणावर नगरपरिषदेकरीता आलेल्या फायरब्रिगेड गाड्या, आरोग्य विभागाला मुख्यमंत्री निधीमधून मिळलेल्या 9 रूग्णवाहिका, 24 लसीकरणासाठी आलेल्या रूग्णवाहिका तसेच पोलीस विभागाला जिल्हा नियोजन मधून दिलेल्या ९ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
एकनाथ शिंदे म्हणाले, विकास कामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्या प्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच 500 केाटींचे रस्ते व पुलांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतिक्षेत असलेले मेडीकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपाआपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अजय कंकडालवार यांनी जिल्ह्यातील ब्रीज कम बंधारे यातून दळणवळणाला चालना मिळाल्याचे सांगितले. पोलिस क्रीडांगणावर नव्याने बांधण्यात आलेल्या किल्ला भिंतीचे अनावरण करण्यात आले.
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
राज्यात शनिवारी दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस उप महानिरिक्षक संदिप पाटिल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिप सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *