गडचिरोली बदल रही है …

पूर्व विदर्भ
गडचिरोली : जिल्ह्यातील विकास कामे, नवीन कामांचे शुभारंभ पाहून मला असे वाटतेय की ‘अब गडचिरोली बदल रही है’ असे उद्गार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार [ vijay vadettiwar ] यांनी काढले. सद्या पालकमंत्री व आम्ही जिल्ह्यासाठी विकासाचं मोठं पाऊल टाकत आहोत. या आलेल्या वाहनांमुळे दुर्गम भागातील आरोग्य विषयक गरजा पुर्ण होतील असे ते यावेळी म्हणाले. येत्या काळात गडचिरोलीसह चंद्रपूरसाठी नव्या पध्दतीचे आधुनिक आपत्ती मध्ये मदत करणारे वाहन पुरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते 200 ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे व बायोमेडीकल वेस्टेज व लाँड्रीचा शुभारंभही करण्यात आला. यानंतर कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानाच्या 2.5 कोटी रूपये  नूतनीकरण कामाचा शुभारंभही त्यांनी केला. कॉम्प्लेक्स परिसरातीलच नव्याने नूतनीकरण केलेला जलतरण तलावाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी क्रीडा संकुल मधील बॅडमिंटन कोर्टवर खेळून क्रीडा विषयक संदेश दिला.
पोटेगाव रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या नविन बांधकामाकाचे भूमिपूजन ही करण्यात आले. याकरीता अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून रु. 44.51 कोटीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केला आहे. यातील 27 कोटी रूपयांना प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. पैकी बांधकामाकरीता रुपये 24 कोटी 31 लक्ष रूपयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. माहे ऑगस्ट 2021 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले असून नियोजित कालावधी 18 महिन्याचा आहे. सदर कामामध्ये प्रशासकीय इमारत तयार करणे, इनडोअर हॉल, बॅडमिंटन हॉल, 2 सुरक्षारक्षक कक्ष सोबत 1 मुख्य प्रवेश द्वार, कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) बांधण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात  जिल्हा क्रीडा संकुलाकरीता उपलब्ध असलेल्या जागेवर रुपये 35 कोटी खेळाकरीता नियोजित असून त्यात प्रेक्षक गॅलरी, मुलामुलींचे वसतीगृह, जलतरण तलाव, विविध खेळांचे मैदान, अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकाम नियोजित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *