Home ब्युटी अँड फॅशन वर्ल्ड सोलापूरच्या ईशाची ‘मिस इंडिया’साठी निवड

सोलापूरच्या ईशाची ‘मिस इंडिया’साठी निवड

78
Photo Courtesy Isntagram

MISS INDIA : सध्याच्या घडीला अफगाणिस्तानातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत जगभरात चर्चा होत असतानाच सोलापुरातील तरुणीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ईशा अभय वैद्य [ ISHA ABHAY VAIDYA ] या डॉक्टर तरुणीची मिस इंडियासाठी निवड झाली आहे.

माहितीनुसार, मागील फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल 26 मुलींमधून ईशा निवडल्या गेली. जयपुरातील दुसºया चाचणीत तिची निवड झाली. यानंतर आता तिसरी चाचणी ही राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. या महत्त्वाच्या चाचणीसाठी ईशा सहभागी झाली आहे. या स्पर्धेत निवड झाल्यास ईशाला इंटरनॅशनल, मिस मल्टिनॅशनल, मिस एशिया पॅसिफिक आदी स्पर्धांमध्ये संधी मिळणार आहे. त्यामुळे आता ईशाच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम)