देशाच्या सीमा ओलांडल्याच्या तणावातही ते निगारस हास्य…पहा हा व्हिडिओ

राष्ट्रीय

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तान (Afghanistan) जगाच्या केंद्रस्थानी आला आहे़ कोरोनाचा विषय पार डोक्याबाहेर फेकला गेला़ अफगाणी नागरिक देश सोडत आहे़ काबूल विमानतळावर दिवसरात्र प्रचंड गर्दी दिसून येतेय.

महिला आणि लहान बालके पुरुषांसोबत धावताना दिसताहेत़ कुठून तरी गोळीबाराचा आवाज येतो आणि काही वेळ काळही थांबून श्वास घेतो़़़पुन्हा पळापळ सुरू होते.

अशा धावपळीतून भारत सरकारने आपल्या नागरिकांना देशात आणण्याची मोहीम सुरू केली आहे. रविवारी सकाळी भारतीय नागरिकांसह अफगाणी नागरिकांनाही आणण्यात येत आहे. मानवी आधारावर सरकारने लहान शिशूंना कोणत्याही कागदपत्राशिवाय देशात प्रवेश दिला आहे.

काबूलवरून (Kabul Airport) दोहा मार्गे विमान हवाईदळाच्या गाझियाबाद [ Ghaziabad ]  तळावर आणले असता या प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. काल रविवारी भारतीय वायुसेनाच्या सी-17 विमानाद्वारे 168 प्रवाशांना देशात आणले. [168 people evacuated from Afghanistan ] गाझियाबाद हवाईतळावर आपल्या मातेच्या कुशीत असलेल्या काही दिवसांच्या बाळाची त्याची चिमुकली बहीण त्याचा गालगुच्चा आणि चुंबन घेतानाचा क्षण अनेकांनी अनुभवला.

त्यांना कुठे काय बंदूक, गोळीबार, तालिबानी, देशांच्या सीमारेषा माहिती? ते दोघेही जण केवळ प्रेमात लिप्त दिसून आले.

( Tweet साभार : एएनआय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *