Home उपराजधानी नागपूर सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवावर निर्बंध

सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवावर निर्बंध

30

GANPATI BAPPA 2021 : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवावर काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पुण्यातील हातमाग कागद संस्थेने कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती पुन्हा एकदा बाजारात आणल्या आहेत. यंदाचं या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे यंदा त्यापैकी काही मूर्ती न रंगवलेल्या स्वरूपात उपलब्ध असून तुमचा बाप्पा तुम्हीच घरी रंगवा या संकल्पनेवर आधारित आहेत. प्रामुख्यानं घरातील लहान मुलांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे. केवळ कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या मूर्तीसाठी शाडू मातीचा सुद्धा वापर झालेला नसल्यानं या मूर्ती खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक असल्याचा दावा संस्थेनं केला आहे. विसर्जन केल्यापासून अवघ्या ६ तासांत त्याचे पूर्णपणे विघटन होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय विसर्जनासाठी फिरते हौद ही संकल्पना देखील यावर्षी पुन्हा राबवली जात आहे.