हॉटेल्समधील नोकरीतून ‘ती’ पोहोचली थेट पडद्यावर…

मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य
सध्या ओटीटीवर (ओव्हर द टॉप) तीन चित्रपटांची चलती दिसून येत आहेत. यात अजय देवगणचा ‘भूज’, अक्षयकुमारचा ‘बेल बॉटम’ आणि शहीद विक्रम बत्रा यांच्यावरील ‘शेरशाह’. या तिन्ही चित्रपटांना बºयापैकी यश मिळाले आहे. हे तिन्ही मूव्ही देशभक्ती कथांवर आधारित आहेत अर्थात त्यांचा वास्तवाशी स्पर्श असल्याचे दिसून येते.
बेल बॉटममध्ये तीन नायिका आहे,यापैकी वाणी कपूर ही अक्षयकुमारची नायिका आहे.
तिचा हा चौथा अथवा पाचवा मूव्ही असावा. यशराज फिल्मस यासारख्या बॅनरच्या माध्यमातून वाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच चित्रपटातील दमदार अभिनयाने तिने समीक्षकाचे लक्ष वेधून घेतले होते.
वाणी कपूरचा चित्रपटसृष्टीशी तसा कोणताही संबंध नव्हता. तरीही ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा पहिल्या चित्रपटाची विशेष चर्चा झाली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. मात्र, तिच्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजन इंडस्ट्रितून झाली होती. वाणीने ‘राजूबेन’ शोमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर यशराज फिल्मससोबत 3 चित्रपटांसाठी करार केला.
वाणीचा जन्म 23 आॅगस्ट 1992 रोजी दिल्लीत झाला. (अर्थातच काल तिचा वाढदिवस पार पडला.) वाणीचे वडील शिव कपूर उद्योगपती आहेत. आई डिम्पी असून त्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे़ तिने आपले शिक्षण दिल्लीतील अशोक विहार येथील माता जयकौर पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर इग्नूमधून पर्यटन (टुरिझम) या विषयात पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशीप पूर्ण केली. त्यानंतर ती आयटीसी हॉटेल्समध्ये काम करत होती. हॉटेल्समधील नोकरीतून ती थेट पडद्यावर पोहोचली.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *