केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य

कोकण

NARAYAN RANE ARRESTED : मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरीकडे रवाना झाले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांकडे नारायण राणे यांचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *