Home राष्ट्रीय नॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाईन – रोखीकरण योजनेचा प्रारंभ

नॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाईन – रोखीकरण योजनेचा प्रारंभ

27

NATIONAL NEWS : महामार्ग, रेल्वे, स्टेडियम, ऊर्जानिर्मिती आणि वितरण आदींसारखी सरकारी मालमत्ता, खासगी क्षेत्राला व्यावसायिक वापरासाठी देणाऱ्या, नॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाईन – रोखीकरण योजनेचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रारंभ केला.

देशात तयार असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून त्यातून उभी राहिलेली रक्कम नवीन पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. सरकारनं २०२२ ते २०२५ या चार वर्षांसाठी ही योजना तयार केली आहे.

राष्ट्रीय रोखीकरण योजनेमध्ये केंद्र सरकारच्या प्रमुख पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सहा लाख कोटी रुपयांचं रोखीकरण होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.