सप्टेंबरमध्येही पाऊस पाठ फिरवण्याचा अंदाज, निसर्गाच्या विरोधात कृत्ये केल्याचा परिणाम भोवणार

राजधानी मुंबई

मुंबई : आॅगस्टप्रमाणेच पुढील सप्टेंबरमध्येही पाऊस पाठ फिरवण्याची शक्यता खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने [ SKYMET ] वर्तवली आहे. पृथ्वीवरील संपूर्ण मानवजातीने निसर्गाविरोधात केलेल्या अमानुष कृत्याचा (प्रदूषण, जंगलतोड, रासायनिक पदार्थांचा अतिवापर) परिणाम चांगलाच अंगलट येत आहे, यात शंका नाही.

सप्टेंबरमध्ये 20 टक्के दुष्काळ पडण्याची शक्यता असून, पाऊस सामान्य राहण्याची 60 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, सामान्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के असल्याचं सांगण्यात आले आहे.

यंदा जून महिन्याच्या अखेरीस सरासरीच्या (110 टक्के) चांगला पाऊस झाला. 11 जुलै 2021 पर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होता. या महिन्यात सरासरीच्या 93 टक्के इतका पाऊस पडला. ‘स्कायमेट’ने जूनमध्ये 106 तर जुलैमध्ये 97 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती.

जुलै महिन्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला आणि आॅगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात यात आणखी घट झाली. कमी पावसामुळे आॅगस्टच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतात हंगामी पावसाची तूट 9 टक्केइतकी खाली आली आहे. आॅगस्ट महिना संपण्यास आठवडाभराचा अवकाश असून, यात फारशी सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *