प्रथमच पाच महिला अधिकाºयांना कर्नल पदावर बढती

अनुपमा... महिला विश्व

NATIONAL CAPITAL: भारतीय लष्कराने आज प्रथमच पाच महिला अधिकाºयांना कर्नल पदावर बढती दिली आहे. गणना योग्य सेवेला 26 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. कॉर्नल्स आॅफ सिग्नल, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनियर्स (ईएमई) आणि कॉर्प्स आॅफ इंजिनिअर्समध्ये सेवा देणाºया महिला अधिकाºयांना कर्नल पदासाठी प्रथमच मान्यता मिळाली आहे.

शाळेपासून वंचित असलेल्या 17 कोटी मुलांसाठी ‘व्हर्च्युअल ओपन स्कूल’ सुरू

यापूर्वी कर्नल पदावर पदोन्नती केवळ आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमसी), जज अ‍ॅडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कोर (एईसी) मधील महिला अधिकाºयांना लागू होती. आता या निर्णयानंतर भारतीय लष्कराच्या अधिक शाखांमध्ये पदोन्नतीचा मार्ग विस्तारणे हे चांगले लक्षण आहे. भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांतील महिला अधिकाºयांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या निर्णयाबरोबरच हे पाऊल भारतीय लष्कराचा लिंग समान सैन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवते.

सप्टेंबरमध्येही पाऊस पाठ फिरवण्याचा अंदाज, निसर्गाच्या विरोधात कृत्ये केल्याचा परिणाम भोवणार

कर्नल टाईम स्केलच्या रँकसाठी निवडलेल्या पाच महिला अधिकाºयांमध्ये सिग्नल कॉर्प्सचे लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्सचे लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल, कॉर्प्स आॅफ इंजिनियर्समधून लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *