Home प्रादेशिक कोकण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सशर्त जामीन मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सशर्त जामीन मंजूर

36

महाड : पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. राणे यांना गोळवलीमध्ये अटक करण्यात आली होती. [ UNION MINISTER NARAYAN RANE ON BAIL ]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी दुपारी अटक केल्यानंतर रात्री महाड न्यायदंडाधिकाºयांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली; परंतु, नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी राणे यांचे वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी केली. यावेळी त्यांना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली होती.