अभिसांज … एक कथा : या चिमण्यांनो़ (भाग एक )

अभिसांज ... एक कथा
लेखक : संजय इस्तारी मुंदलकर 
दिवस पश्चिमेकडं निघाला़ दिशा तांबडसर होत गेल्या़ दिवसभर आसमंतात हुंदडणारी पक्षी आपल्या पिलांच्या ओढीनं परतू लागलीक़ुणी नवं क्षितिज शोधण्यासाठी बाहेर पडलं होतं, कुणी आपल्या पंखातील बळ अजमावून पाहण्यासाठी भरारी घेतली, तर कुणी आपल्या पिलांच्या अन्नासाठी! सर्वांचा हेतू एकच, स्वत्व कमावणं़़़घरट्यातील पक्ष्यांचा किलबिलाट हळूहळू सूर पकडत होता़ पहुडलेली पिले आईच्या आवाजानं घरट्याच्या दारात आली़‘गोकुळ’ नावाच्या त्या घराचा परिसरही चिऊकाऊच्या चिवचिवाटानं भरून गेला़ मागील दारात असलेल्या कलमी आंब्याच्या डहाळ्यात चिमण्यांची घरटी होती़ समोरील अंगणातील अशोकाच्या पानांतही त्यांचं घर होतं, तर आवळ्याच्या सर्वांत उंच फांदीवर कावळे बसून राहत़ त्यांनी कधी आपलं घर बांधलंच नाही़ दिवसभर आकाशात हिंडल्यानंतर रात्रीच्या मुक्कामापुरतेच झाडावर त्यांची राहुटी असे़. [ ABHISAANJ …EK KATHA ]
उषाताई पदर सांभाळत उंबरठ्यात आल्या़ दाराच्या दोन्ही बाजूंनी नजर टाकली़ सुधाकरराव अद्याप बाजाराच्यानिमित्तानं बाहेरच होते़ त्यांचे डोळे सुधाकररावांच्या पावलांकडं लागलेले! आठवडीबाजारात जाऊन त्यांना तासभर तरी झाला होता़‘एफसीआय’मधून सेवानिवृत्त होऊन त्यांना दोनेक महिने झाले होते़ मनाई केल्यानंतरही ते मोपेडवरून गेलेले़ रविवार असल्यानं रस्त्यावर वाहनांची गर्दी नसणार, अशी सबब सांगून ते दुचाकीवर स्वार झाले़ इकडं उषाताईचं मन मात्र थाºयावर नव्हतं़ त्यांची नजर बाहेरच भिरभिरत होती़ हिवाळ्यात दिवस कधी सांजेकडं झुकत, हे कळत नसे़ हुरहुरणारी वेळ असली तरी उषाताईंना ती फार सुखदायक वाटे़मात्र, कधी कधी त्यांचा ऊर भरून येई़ का कुणास त्यांना एक भयानक आणि जीवघेणी अस्वस्थता जाणवत असे़ इतक्यात त्यांची नजर अंगणातील बोगनवेलीकडं गेली़ एका घरट्यातील चिमणीचं पिलू खाली कोसळण्याच्या बेतात होतं़ त्यांच्या छातीत धस्स झालं़ त्या धावतच घरट्याजवळ गेल्या़ दुरूनच हात पुरवत त्या पिलाला अलगद पकडलंआणि घरट्यात ठेवलं़ त्या बाळाची आई आली नसावी़ म्हणून ते बाहेर डोकावलं होतं़ नळाच्या पाण्यानं हात धुवून त्या आत वळल्या़ घड्याळाकडं नजर टाकली़ सव्वासहा झालेले़ नेहमीप्रमाणं हात रेडिओकडं वळला़ आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर बातमीपत्र सुरू होतं़ उषाताई पुन्हा एकदा समोरील दारापर्यंत चालत गेल्या़ तेवढ्यात ‘या चिमण्यांनो़़़’ हे गाणं सुरू झालं़ ‘जिव्हाळा’ चित्रपटातल्या लतादिदींच्या विरही आवाजातील त्या मर्मभेदक गीताने उषाताईचा क्षणापूर्वीचा चेहरा पार बदलून गेला़ आता त्यावर कमालीची आर्तता दिसून आली़ त्या कुठल्यातरी व्याकुळतेचा अनुभव घेत होत्या़.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचे ते दिवस़ उषाताईंनी सुधाकररावांसोबत सप्तपदी घेतली, त्यावेळी घरात सासूसासरे, दोन दीर , एक नणंद, पती आणि त्या स्वत: असा एकूण सात जणांचा परिवार होता़ उषाताईंनी मोठ्या सुनेची जागा घेतल्यानं एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली़ सासरे महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक होते़ सासूबाई अधूनमधून आजारीच राहत़ त्यामुळंच सुधाकररावांना तातडीनं लग्न करणं भाग पडलं़ त्यावेळी ते साधे कारकून म्हणून नोकरीस होते़ उषाताईंचं शिक्षण एमए बीएड झालेलं! एमएला असताना मराठी वाड़्मयात त्यांनी सुवर्णपदक मिळविलं होतं़ एका सांस्कारित परिवारातून त्यांनी घरात प्रवेश केला़त्यांचे वडील शिक्षण विभागात चांगल्या हुद्यावर होते़ नोकरीसाठी चांगल्या संधी येऊनही केवळ आपल्या परिवाराला अधिक वेळ देता यावा, यासाठी त्यांनी त्या नाकारल्या़ दीर आणि नणंद यांचं तर शिक्षण सुरू होतं़ सासºयांना निवृत्त होण्यास आणखी काही वर्षे बाकी होती़ दोनेक वर्षांत नणंदेला उजवणं आवश्यक होतं़ उषातार्इंनी आपल्या सेवाधर्माला प्रथमस्थान दिलं़ एकदा सुधाकरावांनी त्यांना याबाबत विचारलं, त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की आपण देशमुख घराण्यातील मोठी सून आहोत़ त्यामुळे पतीसह सासरच्या अन्य मंडळींचीही देखभाल करणं कर्तव्य आहे़ आजारी सासूबाईच्या आरोग्याला जपणंही जबाबदारी समजतो़ आपल्या सुविद्य पत्नीच्या मुखातून असे शब्द ऐकले, त्यावेळी सुधाकररावांचे डोळे डबडबले होते़ उच्चशिक्षाविभूषित असून कुठलाही ताठा नसल्याने त्यांना पत्नीचा मोठा अभिमान वाटून गेला़ त्यात आणखी एका चांगल्या गोष्टीची भर पडली़ त्यांच्या विवाहानंतर दोन महिन्यांतच सुधाकररावांना वरिष्ठ लिपिक पदावर बढती मिळाली़ देशमुख परिवारातील प्रत्येक सदस्यांना आपल्या घराला नवा ‘पायगुण’ लाभल्याने कोण आनंद झाला! सुसंस्कृत सून मिळाल्याने सुधाकररावांचे आईवडिल खूष होते, तर आपली वहिनी साक्षात लक्ष्मीचं रूप असल्याने दीर-नणंदेला अभिमान होता़
एका रविवारी नवं जोडपंबगिच्यात फिरावयास गेलं़ थोडी पायपीट केल्यानंतर ते बाकावर बसले़
लग्न आटोपून पाचेक महिने झाले असले तरी त्यांच्यात हवा तो मोकळपणा आलेला नव्हता़ उषाताई आपल्या साडीच्या पदराच्या एका टोकाला बोटाभोवती गुंडाळत होत्या़ सुधाकररावही मावळत्या सूर्याकडं बघत होते़ त्या दोघांत कोंडी तयार झाली़ कुणी अगोदर बोलावं त्यावरून त्यांच्या मनात घालमेल होत होती़ शेवटी उषाताईंनंच मौन तोडलं,‘‘अहो, मी काय म्हणतेय़’’
इकडे सुधाकररावांचे कान आसुसले होतेच़ त्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली़ ‘‘काय म्हणतेस?’’
उषातार्इंना आपल्या मनातील भविष्याला दिशा द्यायची होती; पण ‘हे’ काय म्हणतील? या प्रश्नात त्या गुरफटलेल्या होत्या़ सुधाकरराव त्यांच्याकडे बघत होते़
‘‘अगं तुला काही सांगायचं होतं ना!’’
शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी आपल्या मनाला मोकळी वाट करून दिली़
‘‘मी काय म्हणतेय़़़म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला सध्याचं घर कमी पडतंय़़़’’
बस्स़़़ सुधाकररावांनी इतकं च ऐकलं आणि त्यांच्या चेहºयावरील भाव जलद गतीने बदलले़‘ही आपणास आपल्या आईवडिल,भाऊबहिणीपासून दूर करते की काय? लग्न होवून सहा महिने व्हायचेच आहे आणि ही़़़’ त्यांचं मन पेटून उठलं़ किंचितशा हाताच्या मुठी आवळल्या गेल्या़ त्यांनी उषाताईकडं बघितलं तर त्या पायाच्या एका बोटानं जमीन उकरत होत्या़ सुधाकररावांचा अबोलपणा बघून त्या म्हणाल्या,
‘‘अहो, मला असं वाटतं की आपल्या घरी कॉलेजमध्ये जाणारे तिघेजण आहेत़ त्यांना अभ्यास करण्यास पुरेशी जागा मिळत नाही़ नणंदबाई आपल्या मैत्रिणीकडं अभ्यासाला जातात़ मी म्हणते आपण हे घर विकून नवं घर विकत घेवू या़ आणि पैसे कमी पडल्यास त्याची व्यवस्था मी करते़’’
यावर सुधाकररावांच्या मनाची अवस्था किंचितशी मवाळ झाली़
‘‘अगं, आत्ताच आपलं लग्न झालंय़ त्यात बराच खर्च झालायं़ बाबांना आपल्या फंडातून काही रक्कम कर्जाऊ घ्यावी लागली़ त्यामुळं ते शक्य नाही़ शिवाय आईच्या औषधीसाठी काही रक्कम ही राखीव ठेवावी लागते़़़आणि घर घेण्यास मोठी रक्कम हाती पाहिजे़ तू कोठून व्यवस्था करणार?’’
‘‘ अहो, दागिने आहेत आपल्याकडे? ते विकूयात़’’
‘‘नको़़़ बिल्कुल नको़ ते तुला माहेरहून मिळालयं़ त्यावर केवळ तुझाच हक्क आहे़ ’’
‘‘ अहो, लग्नातील दागिन्याबद्दल मी बोलत नाही़ आईनं मला वेगळे दिलेत़ ते विकून आपल्याला गरज दूर करता येईल़’’
‘‘तरीही नाही़’’
इतकं बोलून सुधाकरराव उभे झाले़ त्यांच्या दृष्टीने तो विषय तिथंच संपला़ काहीशा नाराजीनंच उषाताई घरी परतल्या़ त्यानंतर मात्र त्या स्वस्थ बसल्या नाहीत़ आपल्या सासू आणि सासºयांना त्यांनी विश्वासात घेतलं़ एके रात्री सुधाकररावांनी त्यांना एकांतात विचारलं, ‘‘ काय बाईसाहेब, आता तुम्ही मॅडम होणार आहेस म्हणे!’’
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *