Home राष्ट्रीय संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढवा, केंद्रीय गृहसचिवांचा महाराष्ट्राला सल्ला

संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढवा, केंद्रीय गृहसचिवांचा महाराष्ट्राला सल्ला

68
file photo

NATIONAL CAPITAL :  संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्नांचा वेग आणखी वाढवावा लागेल, असं निरीक्षण भल्ला यांनी नोंदवलं. ज्या भागात संसर्गाचं प्रमाण जास्त आहे; त्या भागातल्या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, कोरोना विषयक नियमांचं काटेकोर पालन आणि लसीकरण मोहीम गतीनं राबवण्यावर भर द्यावा लागेल; असं भल्ला म्हणाले.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.गरज पडली तर संबधित भागात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णयही राज्य सरकार घेऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. संसर्गाचं प्रमाण जास्त असलेल्या भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसींच्या अधिक मात्रा दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी सणासुदीच्या काळात नियमांची अंमलबजावणी आणि चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्लाही गृह सचिवांनी दिला.