राज्यात रात्री संचारबंदी लागण्याची शक्यता

आरोग्य
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात वाढत चाललेला कोरोना संसर्ग पाहता रात्रीची संचारबंदी [ KORONA CURFEW AT NIGHTS IN MAHARASHTRA ] लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात आज ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा सक्रिय करोना बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ८४४ इतकी आहे. रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र अनेक दिवसांपासून देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना तीन दिवसांपूर्वी केली होती. याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, असे आरोग्यमंत्री टोपे [ Maharashtra Health Minister Rajesh Tope ] यांनी म्हटले आहे.
राज्यावरील करोनाचे संकट अजून टळलेले नाही. केरळमध्ये ओणम या सणानंतर तेथील रुग्णांची संख्या वाढलेली आहे. आपल्या राज्यातही सणांचे दिवस येत असून त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे. हे लक्षात घेत राज्य सरकार केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची नक्कीच काटेकोरपणे अंमलबजावणी करेल, असे टोपे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *