Home उपराजधानी नागपूर सायकल रिक्षा चालकांना मिळणार १५०० रुपये आर्थिक सहाय्य

सायकल रिक्षा चालकांना मिळणार १५०० रुपये आर्थिक सहाय्य

21
file photo
  • मनपाद्वारे सर्वेक्षण सुरू : अर्ज करा, योजनेचा लाभ घ्या

नागपूर : कोव्हिडमुळे उद्भवलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत सायकल रिक्षा चालकांची वाताहत झाली. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे करण्यात आली. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागामार्फत सायकल रिक्षा चालकांना १५०० रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय ‘समाधान शिबिर’

नागपूर शहरातील सायकल रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ मिळावा यादृष्टीने मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे झोननिहाय सायकल रिक्षा चालकांची यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी सायकल रिक्षा चालकांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. या झोननिहाय सर्वेक्षणामध्ये जास्तीत जास्त सायकल रिक्षा चालकांनी अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी केले आहे.