अनधिकृत फेरीवाल्याचा महिला अधिकाºयावर जीवघेणा हल्ला, हाताची बोटे कापली

कोकण

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका अनधिकृत फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यात पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून, दुसºया हाताला आणि डोक्यावर मार लागला आहे. हा भ्याड हल्ल्याचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला त्याला ताब्यात घेतले आहे. [ ROAD VENDOR ATTACKED ON LADY OFFICER IN THANE ]

माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याच्या माहितीवरून सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे महानगरपालिका कर्मचाºयांसोबत कारवाईसाठी पोहोचल्या होत्या. ही कारवाई सुरू असतानाच अमरजीत यादव याने पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. डोक्यावर चाकूने मारायचा प्रयत्न केला असतानाच पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापून खाली पडली. यावेळी त्याने सहकारी कर्मचाºयावरही हल्ला केला. घटनेबाबत समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र, यावेळी त्याने स्वत:च्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपी यादव याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *