Home राष्ट्रीय श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज 125 रुपयांच्या विशेष...

श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज 125 रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण

51

ISCON : इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 125 रुपयाच्या विशेष नाण्याचं अनावरण करण्यात येत आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी 4.30 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी पंतप्रधान आभासी यंत्रणाद्वारे संबोधित करणार आहेत.

श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा जन्म 1896 मध्ये कलकता (सध्याचे कोलकाता) येथे झाला. त्यांनी 1933 मध्ये आपले गुरू महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली. स्वामी प्रभुपाद यांनी पाश्चिमात्य देशांत श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार करण्याच्या हेतूने ‘बॅक टू गॉड हेड’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले.

श्रील प्रभुपाद यांचे कार्यकर्तृत्व पाहता गौडीय वैष्णव समाजाने त्यांना 1947 मध्ये ‘भक्ती वेदांत’ अशी उपाधी दिली. श्रील प्रभुपाद यांनी ‘इस्कॉन’ची [ International Society For Krishna Consciousness ] स्थापना केली. ही मोठी भक्त चळवळ ‘हरे कृष्णा चळवळ’ म्हणून ओळखली जाते. या संस्थाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा 89 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.