मध्यप्रदेशातील भाविकांचा राजस्थानात अपघाती मृत्यू

अपघात आणि विश्लेषण

जयपूर : राजस्थानात नागौर जिल्ह्यातील श्रीबालाजी परिसरात ट्रक आणि क्रूझरमध्ये भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अन्य 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. [ Nagaur Accident,11 deceased in Rajsthan ]

माहितीनुसार, मध्यप्रदेशातील उज्जैनमधील काही भाविक राजस्थानातील रामदेवरा दर्शनानंतर करणीमाता दर्शनासाठी निघाले होते़ मात्र,18 प्रवाशांचे क्रूझर वाहन मंगळवारी सकाळी श्रीबालाजी परिसरातील बायपासवर असताना ट्रकसोबत जोरदार धडक झाली. यात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि पीएम मदत निधीतून जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. येथे, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याविषयी बोलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *