Home राजधानी मुंबई अभिनेत्री सायरा बानो हिंदुजा रुग्णालयात दाखल

अभिनेत्री सायरा बानो हिंदुजा रुग्णालयात दाखल

73

मुंबई : अभिनेत्री सायराबानो यांची प्रकृती बिघडल्यामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे सायराबानो यांना रुग्णालयात दाखल आले आहे. तसेच, आॅक्सिजनची पातळी देखील कमी होत असल्याने श्वास घेण्यास त्रास होत आहे. सायराबानो यांची प्रकृती अचानक खालावली असल्याने काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे.
दरम्यान, त्यांचे पती दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी निधन झाले असून, सायरा बानो यांनी मोठा धक्का बसला आहे.