नागपूर शहरात लसीकरण आपल्या दारी मोहिम सुरू

राजधानी मुंबई

NAGPUR SUB CAPITAL : कोरोनाच्या संसर्गापासून बचावाकरिता लसीकरण हाच उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. जे नागरिक लसीकरण केंद्रांवर लस घेउ शकत नाही अशांचे घरी लसीकरण [ HOME CORONA VACCINATION IN NAGPUR ] करण्याची मोहिम नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात राबविण्यात येत आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या मार्गदर्शनात ही लसीकरण मोहिम सुरू आहे. धरमपेठ झोन अंतर्गत गिट्टीखदान येथील विश्वासनगर झोपडपट्टीमध्ये झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांच्या नेतृत्वात घरोघरी जाउन आरोग्य पथकाने नागरिकांचे लसीकरण करून घेतले.

१८ वर्षावरील सर्वांसाठी शहरात १५० केंद्रांवर मनपाद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीकरणाविषयी संभ्रम किंवा अन्य कारणांमुळे अनेक लोक लसीकरणासाठी पुढे येत नाही. झोपडपट्टीतील नागरिकांचे यामध्ये जास्त प्रमाण दिसून येते. याठिकाणी भेट देउनमनपाच्या आरोग्य पथकाद्वारे  नागरिकांचे समुपदेशन करण्यात येते. त्यांना लसीकरणाचे महत्व सांगून त्यांचे तिथेच त्यांच्याच घरी लसीकरण करण्यात येत आहे.

धरपमेठ झोन पथकामध्ये आठ आशा सेविका, ४ परिचारिका व डॉक्टर्सचा समावेश असून यांच्या माध्यमातून मोहिम यशस्वी करण्यात येत आहे, अशी माहिती धरमपेठ झोनच्या झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे [ DR BAHVANA SONKUSALE ] यांनी दिली.
विश्वासनगर झोपडपट्टीमधील घरोघरी जाउन करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला डॉ.गिशा धिंग्रा, नलीनी सावरकर, जयश्री शेंडे यांच्यासह सर्व परिचारिका व आशा सेविकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *