Home उपराजधानी नागपूर नागपूर मनपाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ६ शिक्षकांची निवड

नागपूर मनपाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ६ शिक्षकांची निवड

27

नागपूर : उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या औचित्याने साजरा होणा-या शिक्षक दिनानिमित्त मनपाच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सेवाकार्य बजावून उत्कृष्ट कार्य करणा-या ६ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शिक्षकांना ९ सप्टेंबर रोजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते आदर्श शिक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नागपूर शहरातील सर्व तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनास प्रतिबंध

सुरेंद्रगढ हिंदी माध्यमिक शाळेच्या शिक्षिका कल्पना सुरेशराव माळवे, वाठोडा मराठी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक ईश्वर संतोषराव धुर्वे, सदर उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शाहीन कौसर सैय्यद, बॅ.शेषराव वानखेडे विद्यनिकेतनचे शिक्षक संदीप यशवंतराव अभ्यंकर, साने गुरूजी उर्दू माध्यमिक शाळेचे शिक्षक अब्दुल सलीम अब्दुल रहीम आणि ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळेचे शिक्षक काजी नुरूल लतीफ या सहा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून सर्व शिक्षकांचे महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे आणि शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी अभिनंदन केले आहे.

इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती