Home उपराजधानी नागपूर चायना मांजाने अमरावतीमधील डॉक्टरचा गळा कापला, थोडक्यात वाचला जीव

चायना मांजाने अमरावतीमधील डॉक्टरचा गळा कापला, थोडक्यात वाचला जीव

52

नागपूर : जळगाव शहरात एक डॉक्टर दुचाकीने जात असताना खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे त्यांचा गळा कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉ. जवाद अहमद असे त्यांचे नाव असून, ते मूळचे अमरावतीमधील आहेत.

डॉ. अहमद दुचाकीने जात असताना महामार्गालगत असलेल्या पेट्रोलपंपाजवळ चायना मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लागलीच त्यांचा गळा कापला गेला. लोकमत 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, गळा कापल्यानंतर डॉ. अहमद रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी स्वत:ची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. यावेळी येथून जाणारे रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान राखून डॉक्टरांना रिक्षात टाकले आणि रुग्णालय गाठले.

धक्कादायक म्हणजे सुमारे 10 मिनिटे हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पहात होते. मात्र, तरीही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. सुदैवाने डॉ. अहमद यांचा जीव वाचला असून, त्यांना तत्काळ मदत न मिळाल्याने माणुसकी मात्र हरल्याचा अनुभव येत आहे.