Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र राज्य सरकारकडून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना सुरू

राज्य सरकारकडून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना सुरू

29

सांगली : कष्टकरी माणसाला अन्नाचे महत्व अधिक समजते. अन्न आपण शक्ती समजतो, प्रेरणादाई समजतो, अन्नाशिवाय तर जीवनच नाही. आमचे कामगार काबाड कष्ट करतात, त्यांच्या आरोग्यासाठी व कष्ट करण्याची उर्जा मिळवून देण्यासाठी शासनाच्या कामगार विभागाने मध्यान्ह भोजन ही संकल्पना अंमलात आणली आहे.  योजनेमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसह या क्षेत्राशी निगडित इतर क्षेत्रातील कामगारांचा समावेश करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील कष्ट करणाऱ्या, ज्याचे हातावरचे पोट आहे अशा कामगारांच्या संकटाच्या काळात, त्यांचा दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा कोणताही दुर्धर रोग झाल्यास अशावेळी त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी तसेच या क्षेत्रातील कामागारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तर त्यांचे जीवनमान उंचावेल. महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणात मदत करणे व त्यांसाठी आर्थिक व्यवस्था करणे हा विशाल दृष्टीकोन या मंडळामार्फत ठेवण्यात आला आहे. कामागारांचे आरोग्य, त्यांच्या पाल्याचे शिक्षण ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी घराच्या व्यवस्थेसाठी हे मंडळ त्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कामगारांना या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. आज त्यामध्ये अणखीन एका नवीन योजनेचा समावेश होत आहे, तो म्हणजे बांधकाम कामागार मध्यान्ह भोजन योजना याचा निश्चितच सर्व कामागारांना फायदा होणार आहे.

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

जयंत पाटील म्हणाले, शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे शिवभोजन योजना ही एक अत्यंत चांगली योजना असून या योजनेचा कोरानाच्या कालावधीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना, गोरगरिबांना चांगला लाभ झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अतिशय कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी सुरु करण्यात आलेली बांधकाम कामागार मध्यान्ह भोजन योजना ही अतिशय लोकप्रिय ठरेल. यासाठी कामगार विभागाचे व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अभिनंदन. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी बांधकाम कामगारांना केले.