नागपुरात काळजी गरजेची, कोरोनाबाधितांची संख्या वाढताहेत…

उपराजधानी नागपूर

नागपूर: कोरोना महामारीच्या तिसºया लाटेचा धोका वर्तवण्यात येत असताना नागपुरात काल रविवारी पुन्हा एकदा बांधितांची संख्या दुहेरी आकड्यात पोहचली आहे. रविवारी नागपुरात 10 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. [ CORONA AFFECTED INCREASED IN NAGPUR ]

एकीकडे ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झाल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे शहरात कोरोना पुन्हा डोकेवर काढत असल्याचं दिसत आहे. नागपूर महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नागपुरात कोरोनाच्या दुसºया लाटेत एप्रिल महिन्यात दिवसाला आठ हजारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत होती. अनेकांचा जीवही घेतला. जूनपासून रुग्णांची संख्या घटत गेली. नागपूरच्या ग्रामीण भागात तर कोरोना नियंत्रणात आला आहे. शहरात रुग्णसंध्या एकेरीत रुग्णसंख्या वाढ आली होती. मात्र, रविवारी नागपूर शहरात कोरोनाचे नव्या 10 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन कसोशीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *