Home उपराजधानी नागपूर पावसाने यवतमाळ, अमरावतीला झोडपले, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पावसाने यवतमाळ, अमरावतीला झोडपले, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

96
file photo

HEAVY RAIN IN MAHARASHTRA: सोमवारी विदर्भातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ, अमरावती शहराला चांगलेच झोडपल्याची माहिती आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा [ LOW PRESSURE IN BANGAL BAY ] निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढील 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही त्याचा प्रभाव जास्त असेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याची उपराजधानी नागपुरातही जोरदार पाऊस कोसळला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

sky in nagpur

यवतमाळ जिल्ह्यात गारपीट
नेर तालुक्यातील गावांत गारपीट झाली. वाई हातोला, आनंदनगर, टाकळी सलामी, पिंपरी कलगा, माणिकवाडा गावांना गारांचा तडाखा बसला. यासोबत आर्णी, पुसद, उमरखेडमध्येही जोरदार पाऊस बरसला. सध्या पीकपरिस्थिती चांगली असली तरी गारपिटीमुळे पिकांना तडाखा बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील पाऊस

– नांदेडमधील विष्णूपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरले
– धरणातील पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात 2 हजार 436 क्यूसेक वेगाने सुरू
– नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
-परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, काही गावांचा संपर्क तुटला
– पोळ्याच्या सणालाच बैलजोडी पुरातून बचावली

 

नांदेडमधील गोदावरी नदीला आलेला पूर. छायाचित्र सौजन्य : मुंबई आकाशवाणी