Home राष्ट्रीय एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लशीच्या एक कोटीहून अधिक मात्रा

एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लशीच्या एक कोटीहून अधिक मात्रा

24
file photo

CORONA VACCINATION : भारतात काल एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लशीच्या एक कोटीहून अधिक मात्रा देण्यात आल्या. हे मोठं यश असून गेल्या 11 दिवसात तिसऱ्यांदा हा टप्पा गाठला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

देशभरात आतापर्यंत कोरोना लशीच्या 69 कोटी 68 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. यापैकी पहिली मात्रा म्हणून 53 कोटी, तर दुसरी मात्रा म्हणून 16 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.

पावसाने यवतमाळ, अमरावतीला झोडपले, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

एकाच दिवसात एक कोटी लस मात्रा दिल्या गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आनंद व्यक्त केला. कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताने काल मिळवलेल्या विजयाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी, लसीकरणाच्या आणि क्रिकेटच्या आघाडीवर कालचा दिवस संस्मरणीय ठरला. नेहमी प्रमाणे टीम इंडियाचा विजय झाला, असं ट्विट करत आनंद व्यक्त केला.

CORONA IN NAGPUR : नागपूरकर अजूनही विलक्षण बेजबाबदार, कोरोना निर्बंधांची शक्यता