झाली अभिनेत्री, परीला व्हायचे होते बँंकेत गुंतवणूकदार

मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य

ABHIVRUTTA MOVIE DESK : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ऊँचाई’ चित्रपटात लवकरच पडद्यावर दिसणार ( SCREEN SHARE ) पाहावयास मिळणार आहे. हा चित्रपट सूरज बडजात्या यांची निर्मिती असून, कथा स्वत: सूरज यांनी लिहिली आहे. निश्चितच अमिताभ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परिणीती सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

‘ऊँचाई’ मध्ये अमिताभ, परिणीती, अनुपम खेर, नीना गुप्ता आणि बोमन इराणी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनुपम, बोमन आणि अमिताभ हे तीन जुन्या मित्रांच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजश्री प्रॉडक्शन्सच्या या चित्रपटाचे चित्रीकरण नेपाळमधील सुंदर ठिकाणी ( SHOOTING LOCATIONS ) 5 आॅक्टोबरपासून सुरू करणार आहे. काठमांडू आणि त्याच्या आसपास एक महिन्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे.

परिणीतीबद्दल बोलायचे झाल्यास तिने यापूर्वी गोलमाल अगेन, किल दिल, इश्कजादे, मेरी प्यारी बिंदू, ढिश्शूम, केसरी, साईना, संदीप और पिंकी फरार, शुद्ध देशी रोमान्स अशा काही चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

परिणीती ही एक हुशार विद्यार्थिनी होती़ यात तिला तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते. ती 17 वर्षीच पुढील शिक्षणासाठी विदेशात मेनचेस्टर येथे गेली़ याठिकाणी तिने व्यवसाय, वित्त आणि अर्थशास्त्र विषयात पदव्या प्राप्त केल्या. 2009 मध्ये आर्थिक मंदीमुळे तिला लंडनमध्ये नोकरी करता आली नाही़ यानंतर ती भारतात परतली. यानंतर तिने यशराज फिल्म्समध्ये जनसंपर्क सल्लागाराच्या रुपात काम सुरू केले.

विशेष तिला अभिनेत्री बनायचे नव्हते़ बँक गुंतवणूकदार म्हणून व्यावसायिक होण्याचे ठरवले होते़ कारण यावेळी तिचे वजन तब्बल 86 किलो इतके भरभरक्कम होते;परंतु यशराज फिल्म्स कंपनीचे तीन चित्रपट स्वीकारल्यानंतर तिने आपले वजन 25 किलोंनी कमी केले.

परिणीती ही अभिनेत्री प्रियंका चोप्रा, मीरा चोप्रा आणि बार्बी हांडा यांची चुलत बहीण आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *