महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह ८ जण दोषमुक्त

राजधानी मुंबई
MUMBAI CAPITAL : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आठ जणांना दोषमुक्त केले आहे. आपला न्याय देवतेवर विश्वास आहे. आपण संयमाने सत्र न्यायालयाच्या आदेशाचा स्वीकार करतो, अशा शब्दात अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ [ FOOD SUPPLY MINISTER CHHAGAN BHUJBAL ] यांनी महाराष्ट्र सदनाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला या प्रकरणी अजून एक फूटाचा एफ एस आय किंवा एक रुपया देखील दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. याप्रकरणी ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप छगन भुजबळ आणि अन्य आठ जणांवर झाला होता. निकालानंतर आपण शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्याचे भुजबळ यांनी सांगितले. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात ज्यांना उच्च न्यायालयात जायचे त्यांनी जरूर जावे. निकाल मूळ मुद्यावरच असल्याचे ते म्हणाले.
ही बातमी सुद्धा वाचा : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलित निकषांमध्ये सुधारणा प्रस्तावित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *