मुंबईतील घटना अतिशय धक्कादायक, महिला सुरक्षा ही समाजाचीही जबाबदारी : वर्षा मानकर

उपराजधानी नागपूर
आतापर्यंत अनेक ‘निर्भया’ तयार झाल्या आहेत. त्यामुळे ही समस्या सुटणार की नाही,अशी भीती समाजात निर्माण झाली आहे. ही समस्या केवळ सरकारी आदेशाने वा कायदा करून सुटणारी नाही,तर त्यासाठी समाज सुद्धा जागा व्हायला पाहिजे, असे मत समस्त महिलांकडून व्यक्त होत आहे.
नागपूर : मुंबईत घडलेले ‘निर्भया’ प्रकरण अतिशय निंदनिय असून, समस्त महिलांप्रति धक्कादायक घटना आहे. आरोपींना शिक्षा देण्याचे कर्तव्य कायद्याला पार पाडावयाचे असले तरी महिला सुरक्षा ही समाजाचीही जबाबदारी आहे, असे मत हिंगणा पोलिस ठाण्या अंतर्गत दक्षता समितीच्या सदस्य, बालसंरक्षण समितीच्या सचिव वर्षा मानकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील साकीनाका परिसरात पीडितावर ओळखीच्या व्यक्तीने एका वाहनात अत्याचार केला़ अतिशय क्रूर अत्याचारामुळे तिने उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज दिली;परंतु प्रकृती गंभीर झाल्याने आज शनिवारी तिने राजावाडी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.
वर्षा मानकर
या घटनेसंदर्भात वर्षा मानकर म्हणाल्या, की यापूर्वी नवी दिल्लीतील निर्भया हत्याकांडात आलेला निर्णय हा अभिनंदनीय आणि स्वागतार्ह ठरला होता. मात्र,अशा बिभत्स घटना वारंवार होत आहेत. कायद्याची भीती न राहिल्याने आणि न्यायालयीन निकालास वेळ लागत असल्याने आरोपींना पळवाटा शोधण्यास मदत होते. अशा प्रकरणातील आरोपींवर कुठलीही दयामाया न दाखविता त्यांना कठोर शिक्षा द्यावी. महिलांच्या बाबतीत होणाºया गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी अधिक वेळ लागू नये,यासाठी उपाययोजना कराव्यात. महिलांबाबतच्या अनेक गुन्ह्यांत अल्पवयीन आरोपींचा सहभाग दिसून येतो. केवळ वय लहान आहे म्हणून त्यांची सुटका करण्यात येते;परंतु हेच लोकं पुढे अट्टल गुन्हेगार बनण्याची शक्यता असते. महिलांवर होणाºया अत्याचारामुळे केवळ समाज, राज्य वा देशात परिणाम होत नाही तर तो सर्व बाबींवर होत असतो. निर्भयासारख्या घटना होऊ नये,यासाठी केवळ सरकार, प्रशासनानेच नव्हे,तर समाजानेही राखणदाराची भूमिका बजावणे गरजेचे आहे. समाजातील महिलावर्गाला कशी सुरक्षितता देता येईल,यावर समाजानेही विचार करावा. भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
दिल्लीतील घटना
१६ डिसेंबर २०१२ रोजी ज्योती नामक दिल्लीतील तरुणीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला केला व तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. तेरा दिवसांनी तिचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे तातडीचे उपचार करण्यासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून हलविण्यात आले होते.
ज्योती व तिचा मित्र दक्षिण दिल्लीमध्ये चित्रपट पाहून रात्री घरी परतत होते. सार्वजनिक बस समजून बाजूने जाणाºया एका अनधिकृत बसमध्ये ते चढले. त्या बसमध्ये त्यांच्याशिवाय चालक व इतर पाच व्यक्ती (जे बसचालकाचे मित्र
होते.) प्रवास करत होते. बस योग्य दिशेने जात नसल्याचे समजल्यावर त्याबद्दल विचारले असता गाडीतील सर्वांनी तिला व तिच्या मित्राला एका लोखंडी सळीने मारले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर त्यांना जखमी अवस्थेत बसमधून फेकून दिले. तरुणीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बसमधील हल्ल्यात तिच्या लहान आतड्यांना इजा झाली होती. त्यामुळे ते काढून टाकावे लागले. पुढील उपचारासाठी सिंगापूरला हलवण्यात आले; परंतु तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या कायदेशीर लढाईत आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली़ मात्र, ही घटना घडल्यानंतरच्या काळात आतापर्यंत अनेक ‘निर्भया’ तयार झाल्या आहेत. त्यामुळे ही समस्या सुटणार की नाही,अशी भीती समाजात निर्माण झाली आहे. ही समस्या केवळ सरकारी आदेशाने वा कायदा करून सुटणारी नाही,तर त्यासाठी समाज सुद्धा जागा व्हायला पाहिजे, असे मत समस्त महिलांकडून व्यक्त होत आहे. [ no violence against women ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *