चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार

राजधानी मुंबई

RAIN IN MAHARASHTRA : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने [ I M D ] सांगितले आहे.

येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात [ BENGAL BAY ] कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे हे वारे पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ऐन गणपती उत्सवात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवा : मुख्यमंत्री

विदर्भात बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच, आकाशात विजा चमकू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *