Home राजधानी मुंबई साकीनाका महिला अत्याचार प्रकरणाचा तपास करणार ज्योत्स्ना रासम

साकीनाका महिला अत्याचार प्रकरणाचा तपास करणार ज्योत्स्ना रासम

67
मुंबई : साकीनाका महिला अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस अधिकारी ज्योत्स्ना रासम [ JYOTSANA RAASAM ] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपास अधिकाºयांना एक महिन्याचा वेळ देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त हेमंत नगराळे [ POLICE COMMISSIONER HEMANT NAGRALE ] यांनी दिली.
मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका वाहनात 32 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, यातील संपूर्ण तपासाची जबाबदारी ज्योत्स्ना यांच्यावर सोपवली आहे.
चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार
रासम यांनी 27 वर्षांपूर्वी पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर प्रवेश केला होता. सध्या त्या राज्य गुप्तचर विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.
ज्योत्स्ना रासम यांनी भ्रूणहत्याच्या विरोधात 11 दिवसांत 13 राज्यांमध्ये 6 हजार 580 किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने प्रवास केला होता. यावेळी कमी वेळात सर्वात वेगाने प्रवास करणारी महिला म्हणून त्यांची लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर; १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान