Tapori Turaki …… बंटीनं चुकून गिळलंय…

टपोरी टुरकी ....Jocks for You
एक बाई यवत्याच्या बाजारात सोना आजीला पाहून चेकाळली.
बाई : या वयात सुद्धा कपाळावर टिकली …म्हणजे नशिबवान आहात की आजी.
मग आमची सोना आजीनं तिला टरकावलंच,
अगं बाई ‘टकल्या’ टिकला म्हणून टिकली बी ‘टिकली’.
***
मिस नम्रतानं बस कंडक्टरला विचारलं, हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंडक्टर : कचरा भरू द्या की, निघू लगेच!
कारण, राव कंडक्टर भिवापुरी मिरचीचा ठेचा खाणारा होता…
***
नेहा मोबाईलवरून डॉ. कुजके सोबत बोलत होती.
नेहा : डॉक्टर, माझा नवरा बंटीनं चुकून पॅन कार्ड गिळलंय… काहीतरी करा पट्कन.
डॉ. कुजके : शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा. दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही.
***
सिपाही : चल भाई , तेरी फाँसी का समय हो गया.
कैदी : …पर मुझे तो फाँसी 20 दिन बाद होने वाली थी.
सिपाही : जेलर साहब कह कर गए हैं की तू उनके गाँव का है,
इसलिए तेरा काम पहले.
***
दुकानदार : आमच्या टूथपेस्टमध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे…
निलू : नक्की काय करायचं, ते सांगा…
दुकानकार : म्हणजे ?
निलू : म्हणजे… ब्रश करायचा की तोंडात यज्ञ करायचा.
***
बंट्याच्या घरी पुण्यातून एक पाव्हणा आला…
पाहुणा : काय रे,मोठा झाल्यावर काय करशील?
बंटी : काहीही करीन…पण कुणाच्या घरी जाऊन असे फालतू प्रश्न बिल्कुल्ल विचारणार नाही.
***
मी बाभुळगांवच्या हॉटेलमध्ये एकटाच बसलो होतो…
एका मुलीनं जवळ येऊन विचारलं, तू सिंगल आहेस का? मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, हो…मग काय राव, माझ्या समोरची रिकामी खुर्ची
घेऊन गेली ना ती.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *