वर्धा नदीत बोट बुडाली, 11 बुडाले

विदर्भ

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बेनोडा पोलिस ठाण्याअंतर्गम गाळेगांव येथील वर्धा नदीत नाव बुडाल्याने दुर्घटनेत 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे. नदीत बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अन्य 8 जणांचा अद्याप शोध सुरू आहे. मृतकांमध्ये एका दोन वर्षीय चिमुकलीचाही समावेश असल्याची माहिती आहे.

अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने वर्धातील पाण्याची पातळी वाढली आहे. आज मंगळवारी सकाळी वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाल. यात तिघांचे मृतदेहच हाती आले असून, 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. बेनोडा पोलिसांकडून शोधकार्य राबवण्यात येत आहे.

शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात : गृहमंत्री 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *