बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध : कृ‍षिमंत्री दादाजी भुसे

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : शेतकऱ्यांच्या अर्थकारणामध्ये रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्याअनुषंगाने चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

रब्बी हंगाम 2021 [ RABBI HANGAM ] राज्यस्तरीय नियोजन व आढावा बैठक कृषी आयुक्तालयपुणे येथे घेण्यात आलीत्यावेळी कृषीमंत्री श्री.भुसे बोलत होते. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमकृषी आयुक्त धीरज कुमारसचिव एकनाथ डवलेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव बोटेकृषी विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारीसहसंचालक व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालकठाणे, नाशिककोल्हापूरऔरंगाबादलातूरनागपूर व अमरावती जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारीआत्माचे प्रकल्प संचालक व कृषि आयुक्तालयातील  अधिकारीउपस्थित होते.

कृषीमंत्री श्री.भुसे म्हणालेमहा-डीबीटी पोर्टलवर शेतक-यांच्या सोयीकरीता शेतकरी योजना‘ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे‘ देण्याच्यादृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत प्रणाली विकसित केली आहे. पोर्टलवर समाविष्ट एकूण 11 कृषि योजनांतर्गत घटकांचा लाभ शेतक-यांना देण्यात येतो. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात अस्तित्वात असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि असलेल्या नियमांमध्ये काही बदल केले पाहिजेत याबाबत केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. तसेच बीड पॅटर्न” राज्यात राबविण्याबाबत केंद्र शासनाला विनंती केली होती त्यास केंद्राने अजून मान्यता दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *