द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट रोहयो योजनेत समाविष्ट

पश्चिम महाराष्ट्र

PUNE : फळबाग लागवडीच्या माध्यमातून पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढवणे हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेचे उद्दिष्ट आहे. या वर्षात फळबाग लागवडीसाठी प्रति कृषि सहायक 10 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे लक्षांक निश्चित करुन दिला असून राज्यात 18235.73 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. द्राक्ष [ GRAPES ] केळी व ड्रॅगनफ्रुट या फळांचा रोहयो योजनेत  समावेश करण्यात आला असल्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे [ MINISTER SANDIPAN BHUMARE ] यांनी सांगितले.

बैठकीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील अन्नधान्य पिके व गळीतधान्यबियाणे मागणी व उपलब्धता नियोजननवीन वाणांचे बियाणे साखळी नियोजनरासायनिक खते नियोजनपिकांवरील कीड रोग सर्वेक्षणकृषि पायाभूत सुविधा योजनाभाजीपाला क्षेत्र नियोजन व मागणीबाबत धोरणप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाकृषि व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापना आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *