Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडले जावे : मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडले जावे : मुख्यमंत्री

55

औरंगाबाद : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडले जावे ही आमची पूर्वीपासूनच इच्छा आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच या ट्रेनबाबतही आमचा आग्रह होता. राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. तिच्या पूर्ततेसाठी राज्य सरकार पूर्ण पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

जनहिताच्या कामांत राजकारण आणणार नसून यापुढेही राजकीय मतभेद दूर ठेवून वाटचाल केली जाईल असे स्पष्ट करून श्री.ठाकरे म्हणाले की, जिल्हा परिषद इमारत आकर्षक आणि देखणी झाली पाहिजे याबरोबरच तिच्या सेवेचा दर्जाही उत्कृष्ट असला पाहिजे. १८ महिन्याच्या आत ही इमारत पूर्ण झाली पाहिजे या अटींवर इमारत बांधकामासाठी २० कोटी दिले जातील. या इमारतीच्या बांधकामाबरोबरच ती सुंदर होण्यासाठीही प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.