Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य सोनाक्षी काकुडाच्या ताब्यात…

सोनाक्षी काकुडाच्या ताब्यात…

78
हिंदी चित्रपट क्षेत्रातील ‘दबंग गर्ल’ अशी ओळख मिळवलेली सोनाक्षी सिन्हा [  SONAKSHI SINHAA ] लवकरच ‘काकुडा’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात अभिनय करताना दिसून येणार आहे़ यापूर्वी तिचा अजय देवगणसोबतचा ‘भुज’ चित्रपट पाहावयास मिळाला आहे. या भीतीपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केल आहे.

सोनाक्षीसोबत रितेश देशमुख आणि साकिब सलीम (हुमा कुरेशीचा भाऊ) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शक असून, हा चित्रपट 2022 च्या सुरुवातीला पडद्यावर येण्याची शक्यता आहे.

‘काकुडा’ ची कथा एका गावात विचित्र शापाभोवती फिरत. यात सोनाक्षी, रितेश आणि साकीब यांना एका भुताचा अनुभव येतो. खरी मजा पडद्यावरच येणार असल्याचे सोनाक्षीने सांगितले.

 

ज्येष्ठ अभिनेते असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षीने अगदी कमी चित्रपटांत अभिनय साकारला आहे. यात राऊडी राठौर, दबंग, आर….राजकुमार, लुटेरा, सन आफ सरकार, बुलेट राजा,

जोकर आदी चित्रपटांचा समावेश आहे.
*****