शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने ७५ ठिकाणी होणार शिबिर

उपराजधानी नागपूर

नागपूर : महानगरपालिकेतर्फे शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने महापौर दंत तपासणी शिबिराचा शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. ‘आझादी-७५’ अंतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने संपूर्ण शहरामध्य ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार असून गांधीबाग झोन अंतर्गत दंत तपासणी शिबिराच्या माध्यमातून त्याचा शुभारंभ करण्यात आला.

आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड.संजय बालपांडे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. वैभव यांच्यासह त्यांची संपूर्ण चमू उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य सुविधेकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने विविध भागामध्ये, परिसरात वेगवेगळी आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागाच्या वतीने शहरात डिसेंबर पर्यंत १०७ प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे व त्यादृष्टीने शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. अंधत्व निवारणाच्या दृष्टीने महापौर नेत्रज्योती योजनेंतर्गत कॅटरेगची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येत आहे. महापौर नेत्रज्योती योजनेंतर्गत महात्मे नेत्रपेढी येथे आतापर्यंत ७५० शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून महात्मे नेत्रपेढी येथे रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाते शिवाय लेन्स व आवश्यक चष्मा सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे. याच श्रृंखलेमध्ये आता दंत तपासणी शिबिराचे आयोजन होत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *