देशाला राजकारणाला झालेय काय? गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदल, पंजाब मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, छत्तीसगड मुख्यमंत्रीही बनणार का ‘कॅप्टन’…

राज-पाट

ABHIVRUTTA POLITICAL DESK : पुढील काही महिन्यांनंतर देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत असून, जवळपास सर्वच पक्षांनी अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला आहे. अशातच देशात शनिवारी दोन महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या आहेत. एक पूर्व भागातील पश्चिम बंगालमध्ये आणि दुसरी उत्तरेतील पंजाबमध्ये. एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांला पदावरून खाली उतरावे लागले तर दुसºया राज्यात पक्षांतर झाले आहे.

विद्यमान भारतीय जनता पार्टी [ BJP ] सरकारमध्ये माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपाला मोठा धक्का देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा हात पकडला आहे. बाबुल सुप्रियो यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी आता टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये असताना ममता बॅनर्जी यांना छळो की पळो करून सोडणारे बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारणात काय बदल होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचा प्रवेश हा भाजपासाठी तर मोठा धक्का ठरला आहे; परंतु तृणमूलसाठी फायद्याचा ठरतो काय, हे ही पाहावे लागणार आहे.

दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग [ CAP. AMARINDAR SINGH ] यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याशिवाय मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्या खांद्यावर द्यावी, अशी मागणी अनेकांनी केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पंजाब काँग्रेसमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी राहुल गांधी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित असल्याचे जाखड यांनी समाज माध्यमात म्हटले आहे.

छत्तीसगडमध्येही खरे नाही
छत्तीसगडमध्ये काँग्रेसने [ AICC] डिसेंबर 2018 मधील निवडणुकीत 90 पैकी 68 जागांवर विजय प्राप्त केला. काँग्रेसच्या वाट्याला फारशी राज्य आल्याने ही मोठी संधी मिळाली होती़ मात्र, विजयानंतर मुख्यमंत्रिपदासाठी एक नव्हे तर चार नावे उभी राहिली़ भूपेश बघेल, टी.एस.स्ािंह देव, चरणदास महंत आणि ताम्रध्वज साहू अशी ती चार नावे होते. राज्याच्या प्रमुखपद निवडीच्या निमित्ताने मोठे आव्हान उभे राहिल्याने तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सर्वांना दिल्लीत पाचारण केले. यानंतर देव आणि बघेल यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, याठिकाणी काँग्रेसने राखेत निखारा ठेवला. राज्यात पक्षातील सर्वांना खूष ठेवण्यासाठी त्यांनी अडीच वर्षे-अडीच वर्षांचे धोरण बनवल्याचे सांगण्यात येते.

आणि त्याच आधारावर आता मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्य मंत्री टी.एस़ सिंह देव यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. ते पराकोटीला गेल्याने सध्या छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये असंतोष आहे.
कारण मागील एक महिन्यापासून मंत्री देव हे मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षे-अडीच वर्षे धोरणाच्या आधारे मुख्यमंत्री बनवण्यासाठी दबाव आणत आहे. यावरून त्यांचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबतचे मतभेद पराकोटीला गेले आहेत. त्यामुळे काँगे्रस नेते राहुल गांधी लवकरच छत्तीसगड येथे भेट देण्याची शक्यता आहे. आणि राज्याच्या विकास समाधानकारक केला असेल तरच बघेल यांची खुर्ची वाचणार आहे, अन्यथा…त्यांनाही ‘कॅप्टन’ बनवले जाऊ शकते, यात शंका नाहीच.

News Edited by : Sanjay Lohar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *